तुम्ही जाड उशी घेऊन झोपताय ? लवकर सोडा ती सवय नाहीतर होईल गंभीर परिणाम

झोपताना सर्वात मोठी चूक म्हणजे डोक्याखालील जाड उशी. डोक्याखाली जाड उशी घेऊन झोपायची सवय तुम्हालाही आहे का? तर ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

जाड उशी
तुम्ही जाड उशी घेऊन झोपताय ? लवकर सोडा ती सवय नाहीतर होईल गंभीर परिणाम

 

झोप म्हटली की कसं आरामदयी वाटते. कदाचित असं कोणीच नसेल की त्याला झोप गरजेची वाटत नाही. झोप तर आपल्या दैनंदिन जीवनाचा मुख्य घटक आहे. झोप पूर्ण नाही झाली की आपली आपसूकच चिडचिड होते. तसं पहायला गेलं तर कसे झोपावे याचा आपण नीट समजून घेतले पाहिजे. आजचा हा लेख वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. तुम्हाला डोक्याखाली जाड उशी घेऊन झोपायची सवय आहे का? या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. आवर्जून वाचा. अनेकवेळा झोपताना तुम्ही अशा अनेक चुका करतात की आजाराला स्वत:हून आमंत्रण देतात. चला तर मग जाणून घेऊया नक्की के होते….  .. ..

आरोग्य ही संपत्ती हा सुविचार सर्वांना माहीतच आहे. आपले आरोग्य चांगले व तंदुरुस्त तेवण्यासाठी झोपेचा महत्वाचा भाग असतो. अनिद्रेची समस्या असेल तर आपल्या शरीराचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे ज्याप्रकारे आहार, व्यायाम आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा घटक आहे तसंच झोप सुद्धा महत्वाची आहे. आपल्या शरीराला किमान ८ तास झोप घेणे महत्वाचे आहे. मात्र सध्याच्या या धावपळीच्या जगात हा नियम पाळने सर्वांना जमात नाही आणि त्यामुळेच अनेक आजारांना आपण बळी पडतो.

झोपताना सर्वात मोठी चूक म्हणजे डोक्याखालील जाड उशी. डोक्याखाली जाड उशी घेऊन झोपायची सवय तुम्हालाही आहे का? तर ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. मोठी उशी डोक्याखाली घेऊन झोपणे ही सवय खूप चुकीचे  आणि तुम्ही असं करत असाल तर वेळीच सावध व्हा.  चला तर मग याचे नुकसान जाणून घेऊया ….

मानेचा त्रास

झोपताना मोठी उशी किंवा दोन उश्या डोक्याखाली ठेवल्याने अनेक आजार उद्भवू शकतात. सर्वात पहिला आजार आहे मानेचा त्रास. जाड उशी ठेवल्याने सतत मानदुखी चालू राहते. याकरिता तुम्ही झोपताना नेहमी लहान उशी किंवा मऊ उशीचा वापर करावा.तसं तर उशीशिवाय झोपणे कधीही चांगले. उशीशिवाय झोपण्याची सवय तुम्हाला लावत आली तर बघा प्रयत्न करून..

 

मणक्याचा त्रास

आताच्या काळात अनेकांना तरुण वयातच मणक्यात गॅप जास्त किंवा कमी होणे अश्या समस्या येतात. तसेच मणक्यात कळा येण्याचा त्रास सुरू होतो. याचे मुख्य कारण म्हणजे डोक्याखाली जाड उशी घेऊन झोपणे. जाड उशी घेतल्याने मणक्यांच्या हाडावर परिणाम होतो जाड उशीच्या वापरामुळे आपल्या मणक्यांमधील हाडांमध्ये खूप बदल होतात .त्यामुळे आपल्याला पाठीचा देखील त्रास उद्भवू शकतो.

सर्वात महत्वाचा म्हणजे मेंदूतील रक्तप्रवाहवर होणारा परिणाम

जाड उशीचा परिणाम हा आपल्या मेंदूतील रक्तप्रवाह होतो त्यामुळे ही सवय लवकरात लवकर सोडावी. जाड उशिवर झोपल्यामुळे मेंदूपर्यंत नीट रक्तपुरवठा होत नाही आणि त्यामुळेच केसांनाही योग्य पोषण मिळत नाही. परिणामी केस गळतीचे प्रमाण वाढते त्यामुळे आपली त्वचा देखील खराब झालेले दिसून येते.

3D render of a male head showing brain

खांदा व हात दुखी

बऱ्याच वेळा सकाळी उठल्यानंतर हातामध्ये त्रास होत असल्याची तक्रार बरीच जण करतात त्याचे मुख्य कारण हेच की रात्री जाड उशीवर डोकं ठेवून झोपणे.अनेकांना झोपताना दोन उशा डोक्याखाली लागतात पण ही सवय चांगली नाही त्यामुळे खांदा व हात दुखी चे प्रमाण वाढलेले दिसते. जाड उशी घेतल्यामुळे खांद्याची हाडे खेचली जातात. आणि त्यामुळे हातामध्ये दुखण्याचा त्रास सुरू होतो. त्यामुळे जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर ही सवय मोडता येईल तितकीच बरी.

मानसिक त्रास

आताच्या धावपळीच्या युगात झोप जर पूर्ण व्यवस्थित घेतली नाही तर पूर्ण दिवस कंटाळवाणा जातो कुठल्याही गोष्टीत उत्साह राहत नाही. जाड उशी घेतल्यामुळे सतत ऊस बदलण्याची सवय लागते आणि त्यामुळे झोप मोड होते व झोप पूर्ण होत नाही. झोप खराब झाल्याने तान तणाव वाढतो आणि त्यांत नाव वाढू लागला की दिवसभर काम करण्याची इच्छा होत नाही तसेच अपूर्ण झोपेमुळे मानसिक त्रास वाढतो आणि दिवसभर चिडचिड वाढते.

Unhappy exhausted mature woman with closed eyes lying in bed, touching temples close up, tired female suffering from headache or migraine, feeling unwell, suffering from insomnia, lack of sleep

ऍसिडिटी

ऍसिडिटी हे कारण आता जवळपास सर्वसामान्य झालेलेच आहे. ऍसिडिटीचे  बरीच कारणे असू शकतात पण झोप अपूर्ण झाल्यामुळे सुद्धा ऍसिडिटी वाढू लागते झोप पूर्ण न होण्याचं कारण म्हणजे जाड उशी. म्हणूनच झोपताना जाड उशीचा अधिकाधिक वापर करणे टाळा आणि मऊ उशी वापरण्याची सवय करा.

 

acidity

 

 

Leave a comment

जाड उशी घेताय? मग बघा हे परिणाम ….